MPSC : मित्र दारू पिण्यास सांगतोय, त्यावेळी तुम्ही काय कराल?? MPSC च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाची रंगली चर्चा, उत्तराचे पर्याय होते अजब….

MPSC : रविवारी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संयुक्त पूर्वपरीक्षा राज्यात घेण्यात आली. यामुळे हा पेपर अवघड की सोप्पा याची चर्चा झाली. असे असताना मात्र या पेपर मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
या परीक्षेत विचारण्यात आलेला दारू पिण्याविषयीच्या प्रश्नाचीच चर्चा स्पर्धा परीक्षार्थींमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे नेमका कोणता प्रश्न यामध्ये विचारण्यात आला होता, याची चर्चा रंगली. यामध्ये तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत.
जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या दारू सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल, तर तुम्ही काय कराल? असा हा प्रश्न होता. यामुळे अनेकांना हा प्रश्न वेगळा वाटला. यामुळे पेपर संपल्यानंतर याची मोठी चर्चा रंगली.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी (1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे. (2) दारू पिण्यास नकार देईन (3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन (4) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे, असे वेगवेगळे पर्याय देण्यात आले होते.
अनेकांना हे विनोदी पर्याय वाटले, यामुळे अनेकजण याबाबत गोंधळले. यामुळे असा प्रश्न नेमका का विचारण्यात आला याबाबत अनेकांच्या मनात कुजबुज सुरू झाली. यामुळे पेपर सोपा की अवघड यापेक्षा जास्त या प्रश्नांचीच चर्चा यावेळी झाली.