खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी, पहिल्याच टर्ममध्ये मोदी सरकारने दिलं मोठं पद….

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे.
पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील लढतीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. नणंद-भावजय यांच्यातील हा सामना त्यावेळी कायम चर्चेत होता.
असे असताना मात्र सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवारांनीही सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीत उतरून चूक केल्याचे म्हटले होते. नंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. आता सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आता तर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना तालिक अध्यक्ष पद मिळाले आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तालिका अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी कार्यकाळासाठी अनेक शुभेच्छा. अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.