खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न; घातपात की अपघात?


धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना थोडक्यात बचावले. त्यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर बंडू कांबळे (रा.अंबाजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या डम्पर चालकांचे नाव आहे. या घटनेमागे घातपात आहे का याचा तपास पोलिसाकडून सुरु आहे.

नेमके काय घडले ?

निंबाळकर हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला.

खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी यांनी रोडच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर पुढे निघून गेला होता. मात्र पाठलाग करून त्याला पकडले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!