गाैरी गर्जे आत्महत्या प्रकरणात आईचा धक्कादायक खुलासा ; थेट म्हणाल्या..

पुणे : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी गर्जे पालवे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गौरीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप करत म्हटले की, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. गौरीच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे.माझ्या मुलीमध्ये तेवढी शक्ती आणि सहनशक्ती होती की, ज्यावेळी आम्ही तिला म्हटले की घरी ये.. तिला नाही यायचे होते… ती सहन करणारी होती… ती स्वत: चे स्वत: निर्णय घेणारी होती… आम्हाला आमचा लेकरांन कोणाला काही सांगू दिले नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

अनंत गर्जे आणि गाैरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस व्यवस्थित सर्वकाही सुरू होते. मात्र, घर बदलत असताना गाैरी पालवे हिच्या हाती एक गर्भपाताचा रिपोर्ट लागला. त्या रिपोर्टमध्ये पतीच्या नावे अनंत गर्जे याचे नाव होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. गाैरीने याबद्दलची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. तिने अनंतलाही माफ केले होते. मात्र, तो त्या महिलेच्या आताही संपर्कात असल्याचे गाैरीला कळाले आणि वाद वाढले. या वादातूनच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गाैरी ही लढणारी मुलगी होती, ती आत्महत्या करूच शकत नसल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गाैरी पालवे गर्जे हिच्या आईने म्हटले की, आमचे जे काही प्रश्न होते जे सुटत नव्हते. त्याबद्दलची चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून स्वत: लक्ष घालून चाैकशी करून शेवटपर्यंत तुमची साथ देईल, असे त्यांनी म्हटले आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ते जे बोलले ते करतील. असं त्यांनी म्हटल आहे.

