आपल्या लहानश्या चिमुकलीला घरात एकट सोडून आई गेली सुट्टीवर, माघारी येताच बसला मोठा धक्का…


नवी दिल्ली : आई ती आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. जगात आईला देवासमान मानलं जातं. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जिला टेन्शन असूनही चेहऱ्यावर स्मितहास्य करत राहते. मात्र एखादी आई क्रूर, निर्दयी असून शकते या विचारानेच अंगावर काटा येतो. अशीच एक घटना समोर आली आहे.

कॅंडेलॅरिओने तिची लहान मुलगी जेलीनला, काही तासांसाठी नाही तर १० दिवसांसाठी एकटं सोडलं आणि स्वतः सुट्टीवर गेली. कोणाच्याही देखरेखीशिवाय तिने चिमुकलीला एकटे सोडले.

क्रिस्टल १० दिवसांच्या सुट्टीवर पोर्तो रिको आणि डेट्रॉईटला गेली होती. कॅंडेलरियोने शेजाऱ्यांना तिच्या मुलीची काळजी घेण्यास सांगितले. मात्र, १० दिवसांत त्यांनी पुन्हा तिची विचारपूर करायला किंवा काही हवं नको ते बघायला एकही कॉल किंवा मेसेज केला नाही. अखेर चिमुकलीचा जीव गेला.

क्लीव्हलँड पोलीस विभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना 16 जून रोजी माहिती मिळाली की मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस जेलिनच्या घरी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, तिने स्वत:ला मुलाची आई सांगितलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे एका आईने आपल्या १६ महिन्यांच्या मुलीला घरात एकटी कशी सोडली, तीही कोणत्याही देखरेखीशिवाय? १६ जून रोजी पोलीस जेलीनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगीचा मृत झाल्याचं त्यांना समजले.

दरम्यान, पोलिसांनी चौकशीदरम्यान सांगितले की जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी एका घाणेरड्या ब्लँकेटवर पडलेली दिसली, ज्यावर लघवी आणि शीचे डाग होते. या प्रकरणी पोलिसांनी आई क्रिस्टेल कँडेलेरिओविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!