सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर!! पवारांवर टीका करताना पडळकर पुन्हा बरळले…


पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत पवार कुटूंबावर टीका करत आहेत. यामुळे ते अनेकदा वादात देखील सापडले आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यांनी आता नाव न घेता पवार कुटुंबीयांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली. यामुळे आता पवार गट देखील आक्रमक झाला असून वातावरण तापले आहे.

पडळकर म्हणाले, हे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातं. एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी घरामध्ये मटण आणायचे.

तुम्हाला माहिती आहे ते घर कोणतं आहे. तिची सासू खिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंबीय आहे. असंही पडळकर म्हणाले. याबाबत आता वादाची शक्यता आहे. याला आता पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. ज्यांची ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची लायकी नाही अशांना भाजपकडून पदं दिली आहेत. आणि बोलायला लावलं आहे.

दरम्यान, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यामुळे त्यांची लायकी नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य ते उत्तर देईल असं प्रशांत जगताप म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात आता यावरून देवेंद्र फडणवीस पडळकरांना काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!