आई, मी विष घेतलंय, माझा मृतदेह घेऊन जा! पुण्यात ऑडिओ रेकॉर्ड करून तरुणाने संपवलं जीवन…

पुणे : पुण्यातल एका १८ वर्षांच्या तरूणाने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवलं. त्याने आत्महत्या केल्याच उघड झाले आहे. मात्र आयुष्य संपवण्यापूर्वी त्या१८ वर्षांच्या तरूणाने एक ऑडिओ रेकॉर्डही केला होता.
स्वतःला संपवून घेण्यापूर्वी त्याने आपल्या आईसाठी भावनिक ऑडिओ रेकॉर्ड करत अंतिम निरोप दिला. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. संजय विनोदकुमार राजपूत (वय १८, रा. पिंपरी-चिंचवड) असे त्या तरुणाचे नाव आहे.
संजय याने विषारी औषध प्राशन करून आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे, या आत्मघातकी निर्णयाआधी त्याने आपल्या मोबाईलवर एक ऑडिओ मेसेज रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने म्हटले, आई, मी विष घेतलंय… माझा मृतदेह घेऊन जा. या भावनिक वाक्यांनी संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे.
मम्मी, मी माझा मोबाईल फोडेन. कोणताही पुरावा मिळणार नाही. मला मरायचे आहे. मी विष प्राशन केले आहे. मी लोकेशन पाठवलं आहे, माझा मृतदेह घेऊन जा ” जीवाचा थरकाप उडवणारा असा मेसेज त्याने रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यानंतर त्याने त्याचं आयुष्य संपवलं. मात्र त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. मृत संजय याने डिप्रेशन अर्थात नैराश्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. १७ जून रोजी देहू रोड पोलिस ठाण्यात संजय कुमार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर टेकडीच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळली. त्याने विषप्राशन करूनच आयुष्य संपवलं असं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही हेच नमूद करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा संजय कुमार हा पिंपरी-चिंचवड परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याला आईवडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये संजयकुमार याने आपल्या बहिणींबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना उच्च शिक्षण द्यावं अशी विनंती त्याने पालकांना केली. तसेच त्याच्या आत्महत्येचा एक व्हिडीोही समोर आला असून त्यामध्ये संजय कुमार हा डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसत आहे.
आत्महत्या करणाऱ्या संजय कुमारने ऑनलाइन विषारी औषध मागवले होते अशी माहितीदेखील समोर आली आहे, त्यानंतरच त्याने हे पाऊल उचलले. त्याने आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची सध्या पोलस चौकशी करत आहेत.