“आई मला माफ कर,तु दिलेल्या जीवनाचे…”संभाजीनगरमध्ये 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मन हेलावणारी सुसाईड नोट समोर


पुणे: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 26 वर्षीय तरुणाने कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संदेश दिनकर गवळी (वय २६) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो टँकरचा व्यवसाय करत होता. घरच्या जबाबदारासाठी त्याने बँकेतून कर्ज घेऊन ट्रॅक्टर विकत घेतला होता. हा ट्रॅक्टर काही दिवसांपूर्वी चोरीला गेला. याबाबत संदेशने पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली होती. मात्र चोरीला गेलेला ट्रॅक्टर पोलिसांना सापडला नाही.

दुसरीकडे त्या ट्रॅक्टरच्या कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने दीड वर्षापासून संदेश कर्जबाजारी होता. या नैराश्यातून अखेर त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. घरी कोणी नसल्याने त्याने विष घेतले. त्यानंतर संदेशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे.

सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले की, ट्रकचे 21 लाखांचे कर्ज थकले आहे. त्याला कंटाळून मी माझी जीवनयात्रा संपवीत आहे. यासाठी दुसरे कोणीही जबाबदार नाही. शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. तू दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करू शकलो नाही. आई, मला माफ कर” असे लिहून संदेशने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!