बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली आई, पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंडला पाठवले आणि…, घटनेने पुणे हादरले

पुणे : प्रियकराच्या मदतीनेच स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पोटच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ काढत नराधम आईनेच ते स्वतःच्या प्रियकराला आणि नातेवाईकांना पाठवले. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी आता या नराधम आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
दरम्यान, न्यायालयाने आईसह तिच्या प्रियकरावा १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सहा ६ महिन्यांपूर्वीच या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अल्पवयीन मुलीने आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घर मालकाला सांगितल्याने आईने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मागील वर्षी १३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिल्यानंतर ऑक्टोबरमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यापासून आई आणि तिचा प्रियकर फरार झाले होते, अखेर बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.