आई अन् मुलगी प्रेमात झाली हैवान! प्रियकरांसोबत दोघींनी रचला प्लॅन अन् काढला बापाचा काटा, घटनेने खळबळ…

नवी दिल्ली : एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलीने आपल्या प्रियकरांसोबत मिळून शेतकरी सुभाष उपाध्याय यांच्या हत्येचा कट रचला.

तसेच पोलिसांनी केवळ १३ दिवसांत या गुंतागुंतीच्या खुनाचे रहस्य उघडकीस आणले आहे. आई कविता, मुलगी सोनम आणि त्यांच्या प्रियकरांसह पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मेरठ घडले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, २३ जून २०२५ रोजी ४५ वर्षीय शेतकरी सुभाष उपाध्याय यांची शेतातून घरी परतताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण एक गुंतागुंतीचा खून म्हणून समोर आले होते, परंतु सखोल पोलीस तपास, पाळत ठेवून आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे खुनाचा उलगडा झाला.

तपासात असे समोर आले की, सुभाषची पत्नी कविताचे गुलजार नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते, तर त्याची लहान मुलगी सोनमचे विपिन नावाच्या तरुणाशी संबंध होते. या दोन्ही प्रेम प्रकरणात सुभाष अडथळा ठरत होता, त्यामुळे आई आणि मुलीने आपल्या प्रियकरांसोबत मिळून त्याला संपवण्याचा कट रचला.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. विपिन टाडा यांनी सांगितले की, “सुभाषच्या हत्येचा कट त्याची पत्नी कविता, मुलगी सोनम, कविताचा प्रियकर गुलजार, सोनमचा प्रियकर विपिन आणि एका अन्य साथीदाराने रचला होता.
सुभाषच्या मोठ्या मुलीने यापूर्वी एका दलित तरुणासोबत प्रेमविवाह केला होता, जो सुभाषने स्वीकारला होता. परंतु कविता आणि सोनम यांच्यातील अनैतिक संबंध त्याला सहन होत नव्हते. म्हणूनच त्याला संपवण्याचा प्लॅन आखण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, २३ जूनच्या रात्री सुभाष शेतातून घरी परतत असताना नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी हत्येमध्ये वापरलेली बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय, घटनेत वापरलेले वाहन आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. 6 जुलै रोजी सर्व पाच आरोपींना अटक करून ताब्यात घेण्यात आले.