महाराष्ट्रात तब्बल 93 हजारहून अधिक महिला बेपत्ता..; गृह विभागाची विधानसभेत धक्कादायक माहिती


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्यगृह विभागाने विधानसभेत महिला आणि मुलींच्या बेपत्ता तपशीलवाराची धक्कादायक माहिती सादर केली आहे. या माहितीनुसार राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हजार 940 महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.यापैकी 67 हजार 458 महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं असून सुमारे 71.8 टक्के पुनर्प्राप्ती दर नोंदवण्यात आला आहे.

सर्वपक्षीय आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागानं 2024 आणि 2025 या वर्षांतील बेपत्ता महिला व बालकांची सविस्तर आकडेवारी सभागृहात मांडली. त्यानुसार 2024 मध्ये 45 हजार 662 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती त्यापैकी 30877 महिलांचा शोध घेण्यात यश आल आहे.

2025 मध्ये 48,287 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती त्यापैकी आतापर्यंत 36 हजार 581 महिला सापडले असल्याची माहिती देखील त्यांनी विधानसभेत दिली.तसेच, 2015 पासून ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत 41 हजार 193 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली.

एकूण दोन वर्षांत 93 हजार 940 महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी 67 हजार 458 महिलांचा शोध लागल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली आहे. दरम्यान आकडेवारीनुसार मुंबई, नवी मुंबई, रायगड,नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरांमधून गेल्या दोन वर्षात 15 ते 18 वयोगटातील 4989 मुले बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 4813 मुल सापडली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,सरकार 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबवत आहे.ज्याचा उद्देश बेपत्ता आणि प्रभावित महिला आणि मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडणे हा आहे. त्यामुळे त्यांचा लवकरच शोध घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!