Monu Kalyane : मोठी बातमी! भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची गोळ्या झाडून भर चौकात हत्या, शहरात तणावाचे वातावरण..


Monu Kalyane : भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे.

ही घटना मध्य प्रदेशातील शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुननं मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्यात.

सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचं वातावरण पसरले आहे. Monu Kalyane

इंदूर विधानसभा क्रमांक ३ मधील नेहमीच चर्चेत असणारं नाव म्हणजे, मोनू कल्याणे. मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांमध्ये मोनू कल्याणे यांची वर्णी लागायची.

दोघांनी मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी मोनू कल्याणे यांना मृत घोषीत केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!