आता अवघड झालं! महिन्याची कमाई 8 हजार, आयकर विभागाची नोटीस 12 कोटीची…!


भिलवाडा : आयकर विभागाच्या अजब कारभाराची सध्या चर्चा सुरू आहे. महिना 8 ते 10 हजार रुपये कमावणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाकडून 12 कोटी 23 लाख रुपयांची रिकव्हरी नोटीस आल्याने एकच खळबळ उडाली. ही नोटीस पाहून तरुणाला धक्काच बसला आहे.

तरुणाने थेट सुभाष नगर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. कृष्ण गोपाल छापरवाल असे सदर तरुणाचे नाव आहे. कृष्ण छापरवाल हा दिव्यांग असून, त्याचे फोटोग्राफीचे छोटेसे दुकान आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

राजस्थानमधील भीलवाडा येथे ही घटना घडली आहे. कृष्ण छापरवाल याच्या पॅनकार्ड आणि आधारकार्डचा दुरुपयोग करुन कृष्णच्या नावे सूरतमध्ये दोन कंपन्या सुरु करण्यात आल्या.

असे असताना मात्र या कंपन्यांशी आपला दुरान्वये संबंध नसून, आपण कधी सूरतला गेलोच नसल्याचे कृष्णने स्पष्ट केले. यामुळे आता ही नोटीस आलीच कशी याची चर्चा सध्या सुरू आहे. तरुण फोटोग्राफर असून, लग्नसमारंभात फोटोग्राफी करुन महिन्याला जेमतेम 8 ते 10 हजार रुपये कमावतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!