Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार….


Monsoon Update : राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पावसासह वारे वाहत आहे. अशातच आता नैऋत्य मान्सून पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

मान्सून संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या IMD बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच नैऋत्य मान्सून उद्या रविवार १९ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर जाण्याची दाट शक्यता आहे.

बुधवार २२ मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार २४ मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

नैऋत्य मान्सून ‘या’ तारखेला केरळमध्ये होणार दाखल…

दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्यासाठी येत्या ४८ तासांत अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. शुक्रवार ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

मान्सूनची ठळक वैशिष्ट्ये..

मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो.
यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये

१५ जुलै पर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो.
यंदा देशात मान्सून दमदार बरसणार . सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज.
येत्या मान्सून हंगामात ‘ला निना’ परतणार, पाऊस धो-धो बरसणार.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!