Monsoon Update : मान्सून केरळमध्ये दाखल होताच महाराष्ट्रातील ‘या’ भागात हवामान खात्याचा जोरदार पावसाचा इशारा, जाणून घ्या…


Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आणि उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो केरळमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून ३१ मे या अपेक्षित तारखेपूर्वीच ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रात १ जून ते ३ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय आहे, याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. १ जून ते ३ जून या कालावधीत मुंबई आणि कोकण वगळता खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये १ जूनपर्यंत आर्द्रता आणि उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. खान्देश आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, खान्देशात रात्री उष्णतेची शक्यता आहे. Monsoon Update

उत्तर-पूर्वेकडील सात राज्यांमध्येही मान्सूनने हजेरी लावली आहे. केरळमध्ये सक्रिय झाल्यानंतर, ते आता कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव आणि लक्षद्वीपचा बहुतेक भाग व्यापत आहे.

मान्सून ईशान्य भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या दहा दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

नैऋत्य मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत आज, ३० मे २०२४ रोजी प्रवेश केला आहे. कोकणात आज हलक्या पावसाची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!