पावसाळी पर्यटन जीवावर बेतलं! भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू..

पुणे : पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या मित्रांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम बॅक वॉटर परिसरात पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उडी मारली. पाणी खोल असल्यानं त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
ही घटन रविवारी दुपारी घडली आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेकांची बळी गेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोघांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हे तरुण या ठिकाणी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय.

लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्कयू टीम ने या दोघांचे ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. लोणावळा येथे येणारे अनेक पर्यटक स्टंटबाजी करताना आढळतात. भुशी धरण, धबधबे अशा ठिकाणी पर्यटक स्वतःचे जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अनेक वेळा अपघात झाल्याचे प्रसंग समोर आला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.