मान्सूनचा मुहूर्त हुकला! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं होणार आगमन, काळजी वाढली..

मुंबई : देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनचा मुहूर्त हुकला. कारण ६ जून पूर्वीच हा मान्सून महाराष्ट्रात येईल असा जो अंदाज होता, सुरुवातीला तर तो दोन जून रोजीच मोसमी पावसाचे आगमन होईल असेही संकेत होते, परंतु प्रत्यक्षात आता दहा जून नंतरच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा नव्याने अंदाज आहे.
विजपुरवठा सुरळीत नाही केला तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करणार आमदार अशोक पवार

केरळमध्येच मान्सूनचे आगमन उशिरा होत आहे. २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मोसमी पाऊस येतोय. भारतात यंदा अलनिनोची स्थिती असल्याने मोसमी पावसाचा परिणाम होईल, अशी जी सुरुवातीला भीती वाटत होती तीआता आता खरी ठरताना दिसत आहे. आता तरी देखील हवामान खात्याने मात्र पावसाच्या प्रमाणावर काही परिणाम होणार नाही असा दिलासादायक अंदाज दिला आहे.
गँगस्टर लॉरेन्सचा बुकीला धमकीचा कॉल, रेकॉर्डिंग झाले व्हायरल
तसेच गेल्या पाच वर्षातील मोसमी पावसाची परिस्थिती पाहिली असता, पहिल्यांदाच मोसमी पाऊस लांबलेला आहे, कारण २०१८ मध्ये मोसमी पावसाच्या आगमन केरळमध्ये २९ मे रोजी झाले होते. २०२० मध्ये तो एक जून रोजी आला होता. २०२१ मध्ये तो तीन जून रोजी आला होता.
दरम्यान २०२२मध्ये तो २९ मे रोजी आला होता. यंदाही तो केरळमध्ये एक जून रोजी येईल असे सांगितले जात होते मात्र तो चार जून रोजी देखील केरळमध्ये आला नाही.