Monsoon Makeup : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी ‘असा’ करा मेकअप, मिळेल हटके लूक..


Monsoon Makeup  उरुळी कांचन : रिमझिम पाऊस हा एकीकडे उन्हाने त्रस्त झालेल्यांना एक आगळाच आनंद देतो. आपण थोडीफार काळजी घेतली असता, पावसाचा आनंद तर घेऊ शकतोच, त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्यातही भर टाकू शकतो. Monsoon Makeup

केशरचना : पावसाळ्यात हवेमध्ये दपटपणा जास्त असल्याने विशेष प्रकारची केशरचना अधिक काळ टिकून राहू शकत नाही. अशावेळी तुम्ही साधी वेणी वगैरे घालावी. अशा मोसमात शक्यतो रोलर सेटिंग, हायर सेटिंग, इलेक्ट्रिक रॉड या आधुनिक पद्धतीचा वापर करू नये.

चेह-यावरील मेकअप : पावसाळ्यात चेहन्यावर मुरुमं होतात, म्हणून शक्यतो क्रीमचा अनावश्यक वापर टाळावा. पावडरचा मेकअप पावसामुळे खराब होतो. म्हणूनच अगदी सौम्य मेकअप करावा. तसेच या मोसमात स्टीकरची टिकली व लिपस्टिकचा वापर कुंकवाच्या ठिकाणी करावा. अन्यथापावसाच्या पाण्यामुळे साधी टिकली व कुंकू तर पुसून जाईलच शिवाय तुमच्या कपड्यांवर त्याचे डाग पडतील.

पेहराव : पावसाळ्यात चुकूनही जरीचे अथवा सिल्कचे कपडे घालू नयेत, कारण ते ओले होताच शरीराला चिकटतात. तुम्ही असा पोशाख वापरावा, जो पावसात भिजल्यावरही आकसत नाही. शरीराला चिकटत नाही. जसे सिंथेटिक कपडे, टेरिलीन, नायलॉन व कॉटन इत्यादी.

पर्स : जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल, तर पर्स घेणे तुम्हाला गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी पर्समध्ये नेहमी एक पॉलिथीनची पिशवी ठेवावी. पाऊस आला तर पटकन पर्स पॉलिथीनच्या पिशवीत टाकून तुम्ही निश्चिंत होऊ शकता.

आणखी काही वेगळ्या टिप्स..

डाग शोषून काढण्याची पद्धत..

डाग हटवण्यासाठी प्रथम डागावर साचलेला अंश काढा. कपडा सरळ पसरून ठेवा. डाग असलेल्या भागावर टाल्कम पावडर वा एखादी शोषून घेणारी पावडर व्यवस्थित लावून घ्या व कपडा सरळच ठेवा. एक तासानंतर टाल्कम पावडर झाडून काढा. गरज वाटत असेल तर हीच प्रक्रिया पुन्हा एकदा करा.

लक्षात ठेवा : कधीही कार्पेटवर ॲब्सॉरर्बेट पावडर लावू नये. कपड्यांवर लावलेले सूचनांचे लेबल लक्षपूर्वक वाचावे व त्यानुसार क्लीनिंग एजंट इ. वापरावे. डाग निघाला नाही तर प्रोफेशनलची मदत घ्यावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!