मान्सूनची गती मंदावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली..

पुणे : सध्या राज्यात मान्सून कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मान्सून कधी दाखल होणार याबाबत देखील चर्चा सुरू आहे. आता मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉइंट म्हणजेच नानकोव्हरी बेटापर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर पुढे प्रगती होताना दिसत नाही.
यामुळे मान्सून नेमका कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंदमान-निकोबार बेट समूहाच्या दक्षिणेकडील भागात धडकलेला मान्सून तेथेच तीन दिवसांच्या मुक्कामी आहे.
मान्सून उत्तरेकडील पोर्टब्लेयर सीमेपासून सुमारे ४१५ किमीवर आहे. सध्या राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकरी सध्या शेतात मान्सूनपूर्व कामाची तयारी करत आहेत. यामुळे त्यांचे लक्ष हे पावसाकडे आहे. यातच यंदा पाऊस काहीसा कमी पडेल असेही म्हटले जात आहे.