लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; आदिती तटकरेंची घोषणा…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली असून, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हप्त्याच्या वितरणाबाबत अधिकृत माहिती दिली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सोशल मीडियावर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली.

तटकरे यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनासोबतच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची दमदार वाटचाल पुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!