पैसा, प्रसिद्धी आणि नोकरी…2026 वर्ष ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना लॉटरी लागणार? वर्षाच्या सुरुवातीलाच जगाल राजासारखं आयुष्य…


पुणे : 2025 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत आणि नव्या वर्षाबाबत लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे ते म्हणजे आपलं वर्ष कसं जाणार?अंकशास्त्रानुसार 2026 हे मूलांक 1 चं वर्ष आहे. म्हणजेच नेतृत्व, निर्णय आणि नवीन सुरुवातीचं वर्ष असणार आहे. पण प्रत्येक जन्मतारखेवर याचा परिणाम वेगवेगळा होणार आहे.

अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व दिलं जातं. जन्मतारखेवरून ठरवला जाणारा मूलांक प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर, निर्णयक्षमतेवर आणि यशावर परिणाम करतो. 2026 मध्ये मूलांक 1 च्या प्रभावामुळे काही जन्मतारखांच्या लोकांना पैसा, प्रसिद्धी, नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी हे वर्ष संयम आणि सावधगिरीचा संदेश देणार आहे.

मूलांक 1 ते 4: नेतृत्व, यश आणि स्थैर्याचा काळ..

ज्यांचा जन्म महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. अशा लोकांसाठी 2026 हे नेतृत्व आणि जबाबदारीचं वर्ष ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती, व्यवसायात विस्तार आणि निर्णयक्षमतेत वाढ दिसून येईल. मात्र अहंकार टाळून टीमवर्क केल्यास यश अधिक टिकाऊ ठरेल.

       

मूलांक 2 असलेल्या म्हणजेच 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 2026 हे भावनिक चढउतारांचं वर्ष असणार आहे. कुटुंब, प्रेम आणि नातेसंबंधांना जास्त महत्त्व दिलं जाईल. मूलांक 3 असलेल्यांसाठी 2026 हे यश आणि ओळखीचं वर्ष ठरणार असून शिक्षण, मीडिया आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतात. मात्र वेळेचं योग्य नियोजन न केल्यास अडचणी येऊ शकतात. मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी हे वर्ष संघर्षापेक्षा स्थैर्य देणारं ठरेल आणि मागील मेहनतीचे परिणाम दिसू लागतील.

मूलांक 5 ते 9: बदल, कर्मफळ आणि धाडसी निर्णय…

मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी 2026 हे वेगाने बदलणारं वर्ष असणार आहे. नवीन संधी, प्रवास आणि करिअरमध्ये बदलाचे संकेत मिळतील. मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी प्रेम, कुटुंब आणि सुखसोयी वाढवणारं वर्ष ठरणार असून घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी योग्य काळ मानला जात आहे. (Mulank

मूलांक 7 असलेल्यांसाठी 2026 हे आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रवासाचं वर्ष ठरणार आहे. संशोधन आणि अंतर्मुखतेकडे कल वाढेल. मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी हे कर्मफळाचं वर्ष असून सुरुवातीला अडचणी असल्या तरी वर्षाच्या उत्तरार्धात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी 2026 हे शक्ती, धैर्य आणि नेतृत्वाचं वर्ष ठरणार असून धाडसी निर्णयातून यश मिळू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!