Mohan Bhagwat : ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांना घाला लगाम, सरसंघचालकांनी थेट मोदी सरकारचे टोचले कान, नेमकं घडलं काय?


Mohan Bhagwat : ओटीटीवर बीभत्सपणा वाढला आहे, ओटीटीवर कंटेट हा सर्वासाठी खुला आहे, याचे काही चांगले वाईट परिणाम समाजात वारंवार दिसून येतात. मात्र, यावर काही निर्बंध असावेत अशा मागणी अनेक वेळेला होते.

विजय दशमीच्या मुहूर्तावर संघ मुख्यालय नागपूर येथून आपल्या भाषणावेळी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये ओटीटीचाही समावेश होता.

बांगलादेशात चर्चा आहे. भारत आपला शत्रू आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. अशी चर्चा तिथे आहे. असे नॅरेशन होत आहे. बांगलादेशात जे घडलं तसं घडण्यासाठी भारतात होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. संस्थांना कब्तात घ्यायचं, विद्यापीठ, शिक्षण संस्था, माध्यम या द्वारे समाजात विचारांची विकृती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सरसंघचालकांनी केला.

आपणंच आपल्या लोकांना शिव्या देशाचे वातावरण निर्माण केले जात आहे . लोकांना उग्र करुन, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. यामुळे त्या देशावर बाहेरुन वर्चस्व करणं सोप होतं. कारण आता युद्ध करणं सोपं नाही, त्यामुळे हे केले जात आहे.

देशात अशांतता पसरवण्यासाठी बाहेरील शक्तीला देशात मदत मिळतेय. लोकशाही पद्धतीत देशात अनेक पक्ष आहे. पर्यायी राजकारणाच्या आडून हा अजेंडा सुरु झाला आहे. भारताच्या सिमाभागात याबाबतचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे वेळेवर आपल्याला जागं व्हायचं आहे एका राष्ट्रीय नॅरेटीव्ह चालवायला लागेल. अभियान चालवावं लागेल. समाजाला संरक्षित ठेवण्यासाठी याची गरज आहे.

काही लपून राहत नाही. मीडिया सर्वत्र पोहोचला. घरा घरात मोबाईल पोहचला आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. जो नशा करत नाही. त्याला मागास समजलं जातंय. एका सिस्टम हरण झालंय रामायण झालंय. कोलकात्यामध्ये काय झालंय. तिथे डॅाक्टरांसोबत सर्व देश उभा राहीला. सर्वत्र असं होतंय. गुन्हे आणि राजकारणाचं मिलन झाल्याने असं होत असल्याचा आरोप सरसंघचालकांनी केला.

विषमता येवढी वाढली की आपले संत आम्ही वाटले. वाल्मीत जयंती फक्त वाल्मीकी समाजातंच का व्हावी. सर्व समाजानं करावं. समाजात काय धोके आहे. याची माहिती आपल्या समाजात देणे गरजेचे आपल्या भागातील समाजाची एक समस्या आपण दूर करायला हवी. आपल्यात जी दुर्बल जाती आहे. Mohan Bhagwat

त्यासाठी आपण काय करायचे , हे ठरवायला हवे. समाजातील वेगवेगळ्या जातीमधील लोक एकत्र बसून काम केलं. तर समाजात सद्भावना राहिल, असे ते म्हणाले. ओटीटीवर चालणाऱ्या अश्लाघ्य, अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज आहे.

व्यवस्थित चालायचं असेल तर मिळून चालण्याचा शास्र आहे.संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि अधिकार हा विचार समाजात पोहोचायला हवा. नेहमी सतर्क रहावं जेनेकरुन आचरण चांगलं राहिल, असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!