Mohammad Azharuddin : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण.


Mohammad Azharuddin : यंदा वर्ल्ड कप २०२३ भारतात खेळला जात आहे. या दरम्यान भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ज्युबली हिल्स मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि अझरुद्दीन यांच्या चिंता वाढल्या आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

अझरुद्दीन यांच्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. रचकोंडा पोलिसांनी अझरुद्दीन यांच्यासह एचसीए पदाधिकारी आणि माजी सदस्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत. आता अझरुद्दीन यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांबाबत जामिनासाठी मलकाजगिरी न्यायालयात धाव घेतली आहे.

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते बोस यांच्या तक्रारीच्या आधारे उप्पल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एचसीएचे माजी अध्यक्ष अझरुद्दीन आणि इतर माजी पदाधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, अझरुद्दीनने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याचे उत्तर दिले आहे.

अझरुद्दीन यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केलेला हा निवडणूक स्टंट आहे. हे प्रेरित आरोप आहेत.

माझा या आरोपांशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. वेळ आल्यावर मी पुढील प्रतिक्रिया देईन. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी माझी प्रतिमा डागाळण्यासाठी केलेला हा स्टंट आहे, पण त्यामुळे आम्ही कमकुवत होणार नाही. यामुळे आम्ही अधिक मजबूत राहू आणि कठोरपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!