मोदींनी पुणे दौऱ्यात माझे नाव घेणे हा एक सुखद धक्का! पुण्यातील मनोज पोचट यांनी वक्त केली भावना, दौऱ्यात नेमकं काय घडलं?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला. मोदींनी आपल्या भाषणांमध्ये धानोरी येथील तिरुपती काशी गंगा सोसायटीत राहणार्या पोचट यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख केला. त्यांनी दहा वर्षां पूर्वीच्या आठवणीना उजाळा दिल्याबद्दल पोचट यांचे धन्यवाद मानले.
पुण्यातील भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले नाव घेतल्यानंतर सुरुवातीला मला काहीच कळेनासे झाले. खूप आनंद झाल्याने काय प्रतिक्रिया द्यावी हेेही कळेना. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.
देशाच्या सर्वोच्च पदावर असणार्या व्यक्तीने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला धन्यवाद देणे म्हणजे आनंद द्विगुणीत करणारे, गौरवास्पद आहे, अशी प्रतिक्रिया धानोरीमध्ये राहणार्या मनोज पोचट यांनी दिली आहे.
शेतकरी कुटुंबातील असलेल्या व सध्या आयटी स्टार्ट अप कंपनी चाल विणाऱ्या यांनी मोदींना केलेल्या त्या टि्वट बाबत अधिक माहिती अशी दिली की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना १४ जुलै २०१३ ला नरेंद्र मोदी यांनी एफसी कॉलेजमध्ये त्यावेळच्या चालू घडामोडींवर देशातील परिस्थितीवर युवकांशी सवांद साधला होता.
त्या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मोदींनी फेसबुक पोस्ट करत २०१३ पर्यंत देशात भ—ष्टाचार, काळाबाजार, काळा पैसा, गुन्हेगारी, बेरोजगारी असे खूप प्रश्न असल्याचे लिहीत, देशात विश्वासाची कमतरता असल्याने देश अस्थिर असल्याचे म्हटले होते.
ट्रस्ट डेफिसिटीचा मुद्दा मांडत त्यावर युवकांकडून आपली मते जाणून घेत युवकांशी संवाद साधला होता. त्यानंतर दहा वर्षांनी याच एफसी कॉलेजमध्ये १ ऑगस्ट २०२३ ला मोदींना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते.
त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ३१ जुलैला टि्वट करत मोदींच्या नेतृत्वाखाली दहा वर्षांनंतर देशाने केलेल्या प्रगतीमुळे जगात भारताचे नाव उंचावले आहे. ग्लोबल इमेज चांगली झाली आहे, असे म्हटले होते. सरकार बद्दल विश्वास निर्माण झाला आहे. याबाबत लिहून ट्रस्ट डिफेसीट टू ट्रस्ट सरप्लस परिस्थिती असल्याचेही टिवीटमध्ये नमूद केले होते.
सभेत मोदींनी याची आठवण करून दिल्याबद्दल पोचट यांना धन्यवाददेखील दिले. पोचट म्हणाले, हा प्रसंग मला आनंद देणारा आहे. माझ्यासाठी गौरवास्पद आहे.
मोदींचे भाषण ऐकण्यासाठी मी गेलो होतो, माझा भाषणात उल्लेख केल्यानंतर मला दोन दिवस गावाकडून, मित्र, नातेवाईक, सोसायटी, कंपनीमधून शुभेच्छा देणारे खूप फोन येत आहेत.
मोदी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने जिकडे जातील त्या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची मते जाणून घेतात. त्यामुळे माझ्यासारख्या तरुणाला शक्ती मिळाली आहे. मला माझी मते मांडण्यासाठी त्यांनी आणखी मोटिव्हट केल्याचे देखील पोचट यांनी सांगितले.