अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचे लोकार्पण…
पुणे : पुणे मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दोन तासांत दुसर्या टप्प्यातील सेवा प्रवाशांकरिता सुरू करण्यात येणार आहे.
ही सेवा सुरू झाल्यावर दर १० ते १५ मिनिटांनी या दोन्ही मार्गिकांवरील मुख्य स्थानकांवरून गाड्या सुटणार असून, तिकीट दर ३० ते ३५ रुपयांच्या घरात असणार आहे.
पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. पहिला टप्पा गरवारे कॉलेज ते वनाज यादरम्यान असून दुसऱ्या टप्प्यामधील दोन मार्गिका आजपासून पुणेकरांना सेवा देताना पाहायला मिळणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या मेट्रोमुळे पुणेकरांना मोठा फायदा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पीसीएमसी ते वनाज, असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल. तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाज ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल.
भाड्यामध्ये ३० टक्के सवलत असणार आहे. शनिवारी, रविवारी सर्व नागरिकांसाठी 30 टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे.