गणेशोत्सवात मोदी सरकारचा धडाकेबाज निर्णय! जीएसटी आणली 0 टक्क्यांवर, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच महागड्या वस्तूंवर होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता फक्त दोन जीएसटी स्लॅब असतील, जे 5% आणि 18% असतील, अशी घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याची रचना सोपी करण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवस म्हणजेच 22 सप्टेंबरपासून दोन स्लॅब लागू केले जातील. यामुळे सुमारे 175 वस्तू स्वस्त होणार आहेत.

यामध्ये आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी देखील रद्द करण्यात आला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवस म्हणजेच 22 सप्टेंबरपासून दोन स्लॅब लागू केले जातील. यामुळे 175 वस्तू स्वस्त होतील. आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी देखील रद्द करण्यात आला आहे. यामध्ये लहान वाहने, किराणा सामान, औषधे, सिमेंट स्वस्त होईल.

तसेच तंबाखू, शीतपेये आणि लक्झरी कारवरील कर वाढल्याने हे पूर्वीपेक्षा महाग होतील. सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर दिलासादायक घोषणा केली आहे पण, हानिकारक आणि लक्झरी वस्तू खरेदीसाठी खिशावर पूर्वीपेक्षा जास्त रिकामा करावा लागणार आहे. यामुळे काहीसा दिलासा अनेकांना मिळाला आहे.
आता दूध, चीज, पराठा, पिझ्झा ब्रेड, खाखरा आणि रोटीवर एक रुपायही जीएसटी आकारला जाणार नाही. बटर, तूप, जाम, सॉस, सूप, पास्ता, नमकीन आणि मिठाई यासारख्या वस्तूंवरील कर 5% पर्यंत कमी होईल, जो याआधी 12 ते 18% होता. आता बदाम, पिस्ता, काजू तसेच खजूर आणि लिंबूवर्गीय फळे यासारख्या सुक्या मेव्यावर फक्त 5% GST लागणार आहे.
