मोठी बातमी! मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ‘एवढ्या’ रुपयांची घट…
नवी दिल्ली : सध्या देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे मोदी सरकार ही महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता देशभरातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
देशातील महागाई कमी व्हावी या अनुषंगाने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे याचा अनेकांना दिलासा मिळणार आहे.
निवडणुकांच्याआधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा डबल फायदा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल, पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत.
ओनम आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने देशभरातील सर्व बघिणींना एक गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे फक्त एका वर्गासाठी नाही तर सर्व वर्गांसाठी याबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अनूराग ठाकूर यांनी सांगितले.