मोदी सरकारने अर्थसंकल्पाची तिजोरी उघडली ; शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस ; काय काय मिळालं?

मुंबई : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा देत शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिल आहे.

आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे. विशेष म्हणजे रविवारी अर्थसंकल्प मांडला जाण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे. लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे. दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी ठरत आहोत. कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे .


शेतकऱ्यांना बजेटमधून काय मिळालं?
१) कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार.
२) मत्स्य उद्योगाला चालना देणार.
३) पशुपालन उद्योगाला चालना देणार.
४) मत्स्य पालनासाठी ५०० अमृत जलाशय तयार केले जाणार.
५) नारळ ,चंदन, काजूचे उत्पादन वाढवले जाणार.
६) भारताच्या काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवणार.
७) शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल तयार करणार.
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी, कृषी उद्योग आणि तज्ञ कृषी आणि संलग्न क्षेत्रांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महागाई, हवामान बदल आणि वाढत्या खर्चाच्या आव्हानांमध्ये, शेतकरी संघटनांनीही सरकारसमोर त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. यावर सरकार घोषणा करेल अशी अपेक्षा होती.
