सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीत निवड…


मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याांच्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सुप्रिया सुळे यांची सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार आहे, त्यासाठी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. याआधीही सुप्रिया सुळे यांची निवड ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात करण्यात आली होती.

शिवाय सुप्रिया सुळेंकडे पुन्हा एकदा खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची केंद्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपावली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान खासदारांच्या गटाचे सुप्रिया सुळे नेतृत्व करणार आहे. यात विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, प्रफुल पटेल, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांचा सहभाग असून या सर्वपक्षीय खासदार गटाचे नेतेपद सुप्रिया सुळेंकडे असणार आहे. परिणामी सिंगापूर देशात जाणाऱ्या खासदार गटाचे नेतृत्व या सुप्रिया सुळे करणार आहेत. तर इंडोनेशियात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतेपद श्रीकांत शिंदेंकडे असणार आहे.

तसेच अर्जेंटिनाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक चव्हाण हे करणारा असल्याची माहिती आहे. दरम्यान, ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या नेतेपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मोरोक्कोला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अरविंद सावंत हे करणार आहे.

दुसरीकडे, केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश मस्के आणि संजय राऊत हे एकत्र असणारा आहे. तर चिलेला जाणाऱ्या शिष्टमंडळात रवींद्र वायकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे बाल्टिक्स देशांचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळात असणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!