स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! लोणी काळभोर व सासवड परीसरातील अट्टल मोबाईल चोराला अटक…!


उरुळी कांचन : लोणी काळभोर, सासवड व पुणे शहरासह जिल्ह्यात मोबाईलच्या चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

मोहन लक्ष्मण कडावत उर्फ राठोड (वय २७, रा.महंमदवाडी ता.हवेली जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतील श्रीनाथ चौकातील एका दुकानातून एका अज्ञात चोरट्याने कॅश काऊंटरच्या ड्रॉवर मधून विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना ४ डिसेंबर २०२२ ला घडली होती. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सासवड येथील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा सासवड एसटी बस स्थानकावर येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीच्या जवळ असलेल्या मोबाईलची पडताळणी केली असता सदरचा मोबाईल वरील गुन्ह्यातील असल्याची पोलिसांना खात्री झाली.

दरम्यान, आरोपी मोहन कडावत उर्फ राठोड यांच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे १, भारती विद्यापीठ ४, कोंढवा १, सिंहगड रोड ४, डेक्कन १, मार्केटयार्ड १ असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर, अधिक तपासासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार सचिन घाडगे, विजय कांचन यांच्या पथकाने केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!