Mobile Recharge : फ्री रिचार्ज विसरा; आता Gpay आणि paytm द्वारे रिचार्ज केल्यास लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या…


Mobile Recharge : भारतात मोठ्या प्रमाणावर पेटीएम, गुगल पे, फोनपे ॲप्स वापरले जातात.. या ॲप्सद्वारे लोक भाडे, बिल भरणे, गॅस, फ्लाइट, विमा, मोबाइल रिचार्ज इत्यादी सर्व प्रकारची पेमेंट करतात.

आता मात्र UPI ॲप पेटीएम आणि गुगल पे शी संबंधित अपडेट येत आहे. या ॲप्सद्वारे तुम्ही तुमचा मोबाइल रिचार्ज केल्यास, तुम्हाला आता प्लॅटफॉर्म फी भरावी लागेल. म्हणजेच मोबाईल रिचार्जच्या रकमेव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही पैसे द्यावे लागणार आहे.

तसेच सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी पेटीएमवरून रिचार्ज करताना आकारण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्म शुल्काचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. माहितीनुसार, कंपनी रिचार्ज पॅकनुसार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारत आहे.

       

हे शुल्क पेमेंटनुसार 1 रुपये ते 5 आणि 6 रुपये आहे. तुम्ही एअरटेलवर एका वर्षासाठी 2,999 रुपयांचा रिचार्ज केल्यास, कंपनी तुमच्याकडून 5 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारेल. Mobile Recharge

दरम्यान, Google Pay आणि Paytm ने देखील फोन पेचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे आणि आता या दोन कंपन्या प्लॅटफॉर्म फी देखील आकारत आहेत. वास्तविक, फोनपे बर्याच काळापासून मोबाईल रिचार्जवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहे.

आतापर्यंत, वापरकर्ते फोन पे ऐवजी Google Pay आणि Paytm द्वारे रिचार्ज करण्यास प्राधान्य देत होते, परंतु आता या ॲप्सनी प्लॅटफॉर्म फी देखील आकारण्यास सुरुवात केली आहे.

आता लक्षात ठेवा, सध्या Google Pay आणि Paytm फक्त मोबाईल रिचार्जवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहेत. इतर प्रकारचे बिल पेमेंट सध्या मोफत राहतील. भविष्यात कंपनी यासाठी काही अतिरिक्त शुल्क आकारण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!