Mobile Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट, घटनेत संपूर्ण कुटूंब उध्वस्त, चार चिमुकल्यांनी जीव गमावला…


Mobile Blast : मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये होळीच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना तुम्हा सर्वांचाच थरकाप उडवेल. मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक दुर्घटना घडली.

या घटनेत एक, दोन नाहीतर तब्बल ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी चार मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना ज्या खोलीत घडली, तिथे एक इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला होता.

अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या बाहेर आल्या. यानंतर ठिणगी पडल्यानं बेडवरील फोमच्या गादीने पेट घेतला आणि आग लागली. पाहता पाहता आग संपूर्ण खोलीत पसरली. काही मिनिटांतच संपूर्ण खोली आगीच्या भक्ष्यस्थानी आली.

खोलीत आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब होते. पती-पत्नी आणि त्यांची मुले असे सहाजण खोलीत होते. पती-पत्नीने आपल्या मुलांसह जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आग संपूर्ण खोलीत पसरली होती.

घरातील सर्वचजण होरपळून निघाले. आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेत, घरातील सर्वांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना मेरठच्या, लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. Mobile Blast

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवाशी असलेल्या जॉनीचे संपूर्ण कुटुंब जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. जॉनी हा रोजंदारीवर काम करतो. होळीच्या सुट्टीमुळे जॉनी शनिवारी घरीच होता आणि त्याची पत्नी बबिता स्वयंपाक करत होती. खोलीत त्याची मुलगी सारिका, निहारिक, मुलगा गोलू आणि मुलगा कालू खेळत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान निगरिक आणि कालू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे आगीत होरपळून निघालेल्या इतर दोन मुलांनीही आपला जीव सोडला. तर मुलांचे आई-वडीलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!