Mobile Addiction : पालकांनो वेळीच सावध व्हा! शहरी भागातील ६१ टक्के लहान मुलांना लागलंय मोबाईलचे व्यसन, जाणून घ्या धक्कादायक परिणाम
Mobile Addiction : सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर मुले सर्वाधिक वेळ वाया घालवत आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींकडे स्मार्टफोन पाहायला मिळतात. Mobile Addiction
काहीजणांकडे तर दोन-दोन स्मार्टफोन असतात. धक्कादायक बाब म्हणजे खेळण्या-बागडण्याच्या वयात कित्येक तास ही लहान मुले फोन पाहत बसतात. यामुळेच मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत नुकताच लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने सर्व्हे केला आहे. त्यात ही माहिती समोर आली आहे. सर्व्हेत आलेल्या माहिती नुसारमी शहरी भागातील तब्बल ६१ टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं असून या सर्वेक्षणात २९६ जिल्ह्यांतील ४६,००० हुन जास्त पालकांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यात ६१ टक्के पालकांनी असे सांगितले की, त्यांची मुले दिवसातून ३ तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेतात. बराच वेळ ते गेमिंग किंवा सोशल मीडिया वापरतात. ३९ टक्के पालकांनी असं सांगितलं की, त्यांची मुले दिवसातून १ ते ३ तास मोबाईल घेतात. ४६ टक्के पालकांनी असे सांगितलं की, त्यांची मुले दिवसातून ३-६ तास मोबाईल घेतात, तर १५ टक्के पालकांनी हे प्रमाण ६ तासांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लोकल सर्कल्स ही सर्वेक्षणाची आकडेवारी आता भारत सरकारला देणार आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाला हीी माहिती दिली जाणार आहे. ज्यामुळे, लहान मुलांमधील या वाढत्या समस्येवर काही तोडगा काढता येईल.