मनसेला बालेकिल्ल्यात मोठा धक्का ;’ या’ माजी नगरसेवकाचा पक्षाला जय महाराष्ट्र, व्यक्त केली नाराजी..


पुणे:राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू कोअर कमिटीचे सदस्य आणि माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

माजी नगरसेवक असलेले विरेंद्र तांडेल मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या कोअर कमिटीचे सक्रिय सदस्य होते. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत तांडेल यांनी पक्ष सोडल्यामुळे मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरेंद्र तांडेल यांनी राजीनामा देताना पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.पक्षात गेल्या काही काळापासून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये किंवा संघटनात्मक प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

याआधी मंगळवारी मनसेचे नेते संतोष धुरी यांनी पक्षातून राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्याला २४ तास उलटत नाही तोच मराठी बालेकिल्ल्यातून मनसेच्या या नेत्यानं राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

दरम्यान माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांच्या राजीनाम्यामागे केवळ अपमानास्पद वागणूकच नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हे देखील कारण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे मनसेला फटका बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!