पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेचा उमेदवार ठरला? फायरब्रॅन्ड नेत्याची जोरदार चर्चा…


पुणे : पुण्यात सध्या पुणे लोकसभा पोट निवडणुकीची चर्चा सुरू आहे. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुण्याच्या लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा शिरूर लोकसभेचा उमेदवार ठरला! लांडे यांनी शक्तिप्रदर्शन केले पण पवारांची कोल्हेंना पसंती

यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये आता मनसे देखील उतरण्याची शक्यता आहे.

बारामती तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून, धक्कादायक कारण आले समोर

मनसेकडून पुण्यातील आपला हुकमी एक्का फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी महाराष्ट्र सैनिक करत आहेत. यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.

महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे लोकसभा पोटनिवडणूक निवडणूक लढविण्याची इच्छा स्वतः वसंत मोरे यांनी जाहीरपणे सांगितली नसली तरी समाज माध्यमांवर कार्यकर्ते ती बोलून दाखवत आहेत. कार्यकर्त्यांच्या या इच्छेला मोरेंनी प्रतिसाद देत या चर्चांना आणखीच हवा दिली आहे. यामुळे चर्चा अजूनच वाढत गेली आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत मोरेंना उमेदवारी मिळाली तर लिहून ठेवा राज्यभरातून मनसे कार्यकर्ते प्रचारासाठी पुण्यात येतील, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!