गुजरातमधील जुनागडमध्ये २४ तासांत ३९८ मिमी पाऊस, एकाच दिवसात केला मोठा विक्रम…


जुनागड : सध्या देशभरात गुजरातमधील जुनागडमध्ये गेल्या २४ तासांत ३९८ मिमी पाऊस झाला असून हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली आहे.

सध्या सौराष्ट्र-कच्छ आणि गुजरातच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कच्छ, जामनगर, जुनागढ आणि नवसारी जिल्हे पूरमय झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, ५ जुलैपर्यंत वायव्य ते दक्षिण भारत आणि बिहार ते पश्चिम बंगालपर्यंत हलका ते मध्यम आणि जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुजरात, महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येथील गांधीधाम रेल्वे स्थानकावरही पाणी साचले आहे. अहमदाबादच्या अनेक भागात हीच परिस्थिती आहे. राज्यातील बहुतांश सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनागड जिल्ह्यातील सखल भागात पाण्यापासून वाचण्यासाठी दोन जण वीजेच्या खांबावर चढले.

त्यांना अनेक तासांनी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले गेले. यामुळे येणाऱ्या काळात देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, उत्तराखंड, बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि गुजरातसह देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

गुजरातमधील जुनागडमध्ये गेल्या २४ तासांत ३९८ मिमी पाऊस झाला असून हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!