मोठी बातमी! शिंदे गटातील आमदाराच्या मुलावर अपहरणाचा आरोप, राज्यात खळबळ…
पुणे : शिवसेना शिंदे गटाते आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर शस्त्रास्त्र आणि अपहरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज सुर्वे आणि त्याच्या साथिदाराने गोरेगाव येथील व्यावसायिकाचे अपहरण केले होते.
तसेच व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण आणि अपहरण करण्यात आले. मनोज मिश्रा असे अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ५ वर्षाचा करारनामा रद्द करण्यासाठी हा सगळा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी राज सुर्वे आणि १० ते १५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांनी गोल्बल म्युझीक जक्शनच्या कार्यालयात यात जाऊन मनोज मिश्रा यांना मारहाण केली.
त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवले आणि प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघातील दहिसर पूर्वमधील कार्यालयात नेलं. तिथे मनोज मिश्रा यांच्याकडून १०० रुपयाच्या स्टॅम्पमवर करार लिहून घेतला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे, दरम्यान पोलिसांनी मनोज मिश्रा यांची सुटका केली आहे.