MLAs Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला संक्रांतीपूर्वीच होणार! ‘या’ दिवशी निकाल द्या, कोर्टाचा आदेश..

MLAs Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने वेळ वाढवून देण्यात आली आहे. अपात्रता सुनावणीसाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते.

मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ न देता १० जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावतीने वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, माननीय न्यायालयाने ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष २८ डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करणार असून निकाल देण्यासाठी त्यांना काही वेळ हवा आहे. MLAs Disqualification Case

दरम्यान, २ लाख ७१ हजार पानांचे सबमिशन असल्यामुळे लगेच निकाल देणे शक्य होणार नाही. सध्या अध्यक्ष सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुनावणी घेत आहे. निकाल देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. आता येणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
