राज्यपाल नियुक्त आमदारांना मुहूर्त लागेना! आता नियुक्तीची पुढील तारीख 4 जुलै…

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 12 आमदारांची यादी देऊनही त्यांनी त्याबाबत निर्णय घेतला नाही. याबाबत मोठ्या प्रमाणावर राडा झाला होता.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याची सुनावणी आज पार पडली आहे. बारा विधान परिषदेच्या आमदारांच्या संदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवल्यानंतर राज्यपालांनी त्या 12 आमदारांची नियुक्ती काही केली नाही.
राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राजकीय धुसफुस त्याच्यावरून आजपर्यंत सुरू आहे. परंतु याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पुढील सुनावणी 4 जुलैला होणार आहे.
दरम्यान, आता शिंदे फडणवीस सरकार आले. शिवसेनेमध्ये उभी फूट झाल्यानंतर शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत शासन स्थापन केले. त्यानंतर पुन्हा नवीन शासनाने 12 आमदारांच्या संदर्भात पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता.
परंतु त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता 5 सप्टेंबर 2022 रोजी तो प्रस्ताव पुन्हा शासनाकडे परत पाठवला. यामुळे हा निर्णय कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.