किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळके यांचा हात? गुन्हा दाखल, राजकारणात खळबळ


पुणे : काल पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली.

हल्ल्या झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असे असताना या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे.

एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

किशोर आवारे हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी चार जणांनी त्यांच्यावर हा हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!