Mla Ravindra Dhangekar : गुन्हा दाखल होताच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘मला जेलमध्ये…
Mla Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता यावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पुणे पोलिसांचा जुना प्लॅन आहे. गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. वेळ पडली तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे.
ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असलायने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. माझ्याकडून जी शिवीगाळ झाली तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि भावना होत्या. माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारि कामे बघून जाणूबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.
भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावत आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 महिन्यापासून हे लोक मला अडचणी निर्माण करत आहेत, असे गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले आहेत. आपल्यावर मुद्दाम गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललित पाटील प्रकरणात आवाज उठवल्याने कारवाई केली जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. Mla Ravindra Dhangekar
काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघाने माझ्या विरोधात निषेध सभा घेतली आहे. मुळात इथं सभा घेता येत नाही, अस एक पत्र जिल्हा आधिकारी यांनी यापूर्वीच काढलं आहे.
या आवारात महाराजांचा पुतळा आहे,म्हणून तिथं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. त्या जागेत कुठलीही सभा,कुठलाही मोर्चा आणि आंदोलन त्या ठिकाणी घेता येत नाहीत. काल जे निषेध आंदोलन झालं हे चुकीचं झालं आहे. बेकायदेशीर आहे, असंही धंगेकर म्हणाले आहे.