आता ‘छावा’ करमुक्त करण्यासाठी आमदार राहूल कुल मैदानात! थेट मुख्यमंत्र्यांची भेट देऊन केली मागणी..

पुणे : सध्या सगळीकडे गाजत असणारा ‘छावा’ हा हिंदी चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी दौंडचे भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
यामध्ये आमदार राहुल कुल म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचे चित्रण करणारा चित्रपट आहे.
तो महाराष्ट्रात करमुक्त केल्याने, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसह मोठ्यासंख्येने प्रेक्षकांना कोणत्याही आर्थिक बोजाशिवाय आपला समृद्ध मराठा इतिहास पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे या विनंतीचा सकारात्मक विचार करून राज्यभर छावा करमुक्त करण्यासाठी आवश्यक पावले उचावीत, अशी मागणी केली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चित्रपट रिलीज झाल्यापासून मागणी केली जात आहे.