Mla Lasya Nanditha : कार दुभाजकाला धडकल्याने झाला मोठा अपघात; महिला आमदाराचा मृत्यू, ३७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


Mla Lasya Nanditha : अपघातांच्या घटनेत सध्या अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबाद कँट मतदारसंघातील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्या फक्त ३७ वर्षांच्या होत्या.

हैदराबादमधील नेहरू आऊटर रिंग रोडवर त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. बीआरएस प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

आमदार लस्या नंदिता यांच्यासोबत झालेल्या या अपघातात त्यांच्या चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरातील सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. लस्या नंदिता सिकंदराबाद कॅन्टच्या आमदार आहेत. याच्या काही दिवसांपूर्वीच त्या एका अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या. Mla Lasya Nanditha

बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनीही नंदिताच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, १९८६ मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेल्या लस्या नंदिता यांनी सुमारे दशकभरापूर्वी राजकारणात प्रवेश केला. २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी कवडीगुडा प्रभागात नगरसेवक म्हणून काम केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!