शिरुर तालुक्यातील कामे प्रशासनाने योग्य वेळेत मार्गी लावण्याचे नियोजन करावे ! शिरुर मध्ये आ. ज्ञानेश्वर कटकेंची प्रशासन बैठकीत निर्देश ….


शिरुर : शिरुर शहराचा पुढील ५ वर्षाचे विकासाचे नियोजन पालिकेने करावे शिरुर शहरासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून शिरुरची विकासासंदर्भात वेगळी ओळख तयार करु असा विश्वास शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माउली कटके यांनी व्यक्त केला .

 

शिरुर तालुक्यातील शासकीय आधिकारांसमवेत आमदार ज्ञानेश्वर कटके यांची बैठक झाली .यावेळी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के , गटविकासआधिकारी महेश डोके , उपकार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी शिक्रापुर नितीन महाजन ,सुमीत जाधव ,मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे , दादापाटील फराटे ,स्वप्न्नील ढमढेरे ,स्वप्न्नील गायकवाड ,राजेंद्र गावडे , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , महेश ढमढेरे , सुधीर फराटे , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , भाजपाचे नितीन पाचर्णे , शिवसेनेचेशहरप्रमुख मयूर थोरात ,रंजन झांबरे , सुनील जाधव , अविनाश जाधव , स्वप्न्नील रेड्डी , अमोल वर्पे , आदी उपस्थित होते .

 

आ. ज्ञानेश्वर कटके म्हणाले सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहीजेत याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करु नये असे ते म्हणाले . शिरुर नगरपरिषद प्रशासना समवेत शहरातील प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात येईल शहरातील अंडरग्राउंड वीज तारेचा प्रश्न मार्गी लावला जाईल . शिरुर व हवेली साठी क्रिडांगण करण्याचा मानस असून शिरुर शहरातही जनता दरबार भरविणार असल्याचे कटके म्हणाले .

 

यावेळी नागरिकांनी विविध सूचना व तक्रारी केल्या . पूर्व भागात बिबट्याना पकडण्यासाठी पिंजरे लावावेत पिंपळसुटी, इनामगाव मांडवगण परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे . या बिबट्यांचा बंदोबस्त करावा . राष्ट्रीय महामार्गाचा इनामगाव व काष्टी जवळचा रस्त्याचे काम करावे.लाटेआळीतील शनि मंदिरा जवळ छोटे क्रिडांगण करण्यात यावे .आनंद पतसंस्थेत भ्रष्ट्राचार झाला असून त्यातील दोषींवर कारवाई करावी . शिरुर बसस्थानका लगतचा जमिनी संदर्भातील प्रश्न मार्गी लागावा , सन -२०१२ शिरुर शहराचा विकास आराखडा मंजूर झाल आहे ,विकास आराखडात शिरुर शहरातून जाणारा रस्त्या ३० मीटरचा असताना १८ मीटरचा रस्ता का होत आहे तो रस्त्या विकास आराखडा नुसार अंतराचा व्हावा , शिरुर मधील प्रलंबित अंडरग्राउंट लाईटचे काम सुरु करावे , पीएमपीएलची बससेवा शिरुर ते वाघोली सकाळी व वाघोली ते शिरुर रात्री अशी सुरु करावी , बसथांबेचे फलक लावावेत अश्या सूचना यावेळी करण्यात आल्या .

 

श्रीनिवास घाडगे , महिबूब सय्यद , अनिल बांडे ,बाबूराव पाचंगे , जयवंत साळुंखे ,प्रकाश थोरात , विजय नरके ,महेश ढमढेरे , ॲड . सुप्रिया साकोरे , अर्जून बढे , प्रा . सतीश धुमाळ आदीनी यावेळी सूचना मांडल्या आहेत .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!