MLA Disqualified : मोठी बातमी! शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेवरील सुनावणी संदर्भात मोठ्या घडामोडी, समोर आली मोठी माहिती..


MLA Disqualified मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. MLA Disqualified

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने अध्यक्षांना फटकारले होते.

इतकंच नाही, तर विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. यावर ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केले.

दरम्यान, ६ ऑक्टोबरच्या सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करणार होते. मात्र, आता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!