MLA Disqualification Case : सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी, नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय..


MLA Disqualification Case : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना आज फक्त ठळक मुद्यांचे वाचन केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा दिलासा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज (बुधवार) मोठा निर्णय दिला आहे.

राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे.  MLA Disqualification Case

त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीलेआहेत. आता ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे गट याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!