Mithun Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, योगदानाबद्दल सरकारकडून सन्मान…


Mithun Chakraborty : बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे . भारतीय चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या १७ व्या सोहळ्यात ८ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना मिठूदा असेही संबोधले जाते. २०२४ मध्ये त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार ही मिळाला होता . शिवाय तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी मोहर उमटवली आहे. जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार अशी पदवी मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व असल्याची मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. Mithun Chakraborty

दरम्यान, १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली . ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. १९८२ मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!