पुण्यातील एमआयटी कॉलेजसमोर झालेल्या खुनाचा आरोपी अखेर सापडला! चार महिने फरार असलेल्या आरोपीला बीडमधून गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या..


पुणे : भांडण सोडवत असल्याच्या गैरसमजातून एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. ही घटना ७ एप्रिल २०२३ रोजी एम.आय.टी. कॉलेज समोर घडली होती. या गुन्ह्यात चार महिने फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने बीड येथून बेड्या ठोकल्या आहेत.

अमितकुमार कन्हैय्यालाल विश्वकर्मा (वय.२१ रा. कोपरआळी, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शंतनु शिवराज चाटे (वय. १९ रा. वडगाव घेनंद रोड, आळंदी), विधीसंघर्षीत बालक आणि दिलीप बाबुराव हांगे (वय. २१ रा. वडगाव रोड, आळंदी, पुणे) यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात फरार असलेला दिलीप हांगे याला युनिट चारच्या पथकाने बीड येथून अटक केली आहे. याबाबत मयत अमितकुमार विश्वकर्मा याने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मयत अमितकुमार विश्वकर्मा हे भांडण सोडवत असल्याचा समज झाल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आयपीसी ३०२ चा अंतर्भाव करण्यात आला होता.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिलीप हांगे हा निवडुंगवाडी, ता. बीड येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय आढारी व विनोद महाजन यांना समजली.

त्यानुसार पोलिसांनी नेकनुर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची मदत घेऊन आरोपी दिलीप हांगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला विमानतळ पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!