अल्पवयीन मुलीला धमकावून बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोथरूड पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
पुणे : महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास कोथरुड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सारंग संजय शिंदे (वय २०, रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन युवतीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित युवती आणि आरोपी शिंदे ओळखीचे आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. शिंदेने युवतीला त्याच्या घरी नेले. चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच त्याने मोबाईलवर युवतीची छायाचित्रे काढली.
त्यानंतर त्याने धमकावून तिच्यावर बलात्कार केला. शिंदेच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. शिंदे याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Views:
[jp_post_view]