मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांची सर्वात मोठी घोषणा, थेट बदलली राजकीय समीकरणे, म्हणाल्या, परळीचा गड आता धनंजय मुंडेंच्या…

बीड : राज्यात महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. मात्र, यावर्षीच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदलली आहेत. जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होती ती एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा तूफान चर्चेत आला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणात आरोप झाली आणि थेट धनंजय मुंडे यांनी आपले आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, याकरिता धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव होता. शेवटी त्यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षानंतर एकत्र आले.अशाच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाने बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परळी हा मतदारसंघ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेली परळी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात होती. मात्र धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर परळीत एनसीपीची ताकद वाढली. अलीकडेच परळी नगरपालिका धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेल्याने राजकीय समीकरणे अधिकच बदलली.

या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये परळीतून नेमके कोण लढणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. याच चर्चांना पूर्णविराम देणारे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत केले.
जाहीर सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आहे. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. मला परळीवर जितकं प्रेम आहे, तितकंच प्रेम माळाकोळीवर आहे. आता मी माळाकोळी सांभाळणार.
पुढे त्या म्हणाल्या, मी त्यांना सांगितलं, हा तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही त्यावर प्रेम करा. परळीचं प्रेम धनुभाऊंना करू द्या. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या.” या वक्तव्यातून पंकजा मुंडेंनी परळीच्या राजकारणातून माघार घेण्याचे आणि माळाकोळीवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
